
बाजारात मांडलेली कोणतीही वस्तू विकली जाते, असं म्हटलं जातं. याचा प्रत्यय एका अभिनेत्रीकडे पाहून लोकांना निश्चित येऊ शकतो. कारण, ही अभिनेत्री फक्त पाद विकून लाखो रुपये कमवत आहे.
या अभिनेत्रीचं नाव स्टेफनी मॅटो असं आहे. ती टेलिव्हिजन स्टार आहे. ती आपल्या पोटातील गॅस विकून प्रचंड पैसे कमावते. त्यासाठी ती एक छोटी बरणी वापरते. बरणीत गॅस जमा करून ती तिला सीलबंद करते आणि ती एक बरणी 75 हजार रुपयांना विकते. अशा प्रकारे तिने आतापर्यंत 37 लाख रुपये जमा केले आहेत.
या खास कामासाठी ती वेगळं डाएटही पाळते. नाश्त्यात कडधान्यं, प्रोटीन शेक, उकडलेली अंडी आणि दही घेते. हे सार पदार्श शरीरात गॅस निर्माण करतात. त्यामुळे ती यांचं सेवन करते.
स्टेफनी या बरण्यांसोबत फुलांच्या पाकळ्या आणि एखादी हस्तलिखित चिठ्ठीही जोडते. माझ्या चाहत्यांकडून गेल्या अनेक वर्ष माझ्याकडे वेगवेगळ्या मागण्या आल्या आहेत. त्यात मी वापरलेल्या वस्तुंची खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. त्यात माझे कपडे, आंघोळीचं पाणी वगैरे त्यांना हवे असतात. त्यामुळे मी ही शक्कल लढवली, असं स्टेफनी म्हणते.
तिचा असा दावा आहे की, तिच्या या बरण्यांना प्रचंड मागणी आहे. तसंच तिला असा एक बाजारही माहीत आहे, जिथे मानवी पाद विकले जातात. तिथेही त्या बरण्या विकण्याचा तिचा मानस आहे.
पाहा व्हिडीओ –
View this post on Instagram

































































