एका आकडय़ाची ‘लुकाछुपी’! विकी कौशलचा नंबर प्लेटचा वाद मिटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘लुकाछुपी 2’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान विकी व सारा अली खान दोघांचेही इंदूरच्या रस्त्यावर बाईकवर फिरतानाचे फोटो व्हायरल झाले होते. हे फोटो पाहून इंदूरच्या एका व्यक्तीने विकीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. विकीच्या बाईकचा आणि आपल्या स्कूटीचा नंबर एकच असल्याचा दावा तक्रारदाराने केला होता. मात्र हा वाद आता मिटला आहे. हे प्रकरण एका आकडय़ाच्या  गोंधळातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस इन्स्पेक्टर राजेंद्र सोनी म्हणाले, ‘नंबर प्लेटची तपासणी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की, सगळा गोंधळ हा बाईकवरील बोल्टमुळे झाला आहे.  बोल्टमुळे  1 हा आकडा 4 या आकडय़ासारखा दिसत होता. चित्रपटात वापरण्यात आलेली बाइक ही प्रॉडक्शन हाऊसची आहे आणि यात कोणतीही गोष्ट बेकायदेशीर नाही.’