
सामना ऑनलाईन । मुंबई
अक्षय कुमार व रजनीकांत यांच्यासोबत 2.O या चित्रपटात झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री अॅमी जॅक्सनने तिचा बॉयफ्रेंड जॉर्ज पानायीतोऊ सोबत साखरपुडा केला आहे. अॅमीने इंस्टाग्रामवर त्याचा एक फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे.
अॅमी व तिचा ब्रिटीश बॉयफ्रेंड जॉर्ज हे गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. अॅमीने तिचे हे नाते सुरुवातीला सर्वांपासून लपवून ठेवले होते. मात्र गेल्या वर्षी व्हॅलेन्टाईन डे ला तिने तिच्या या नात्याविषयी सर्वांना सांगितले होते. जॉर्ज हा ब्रिटनमधील व्यावसायिक असून त्याचे वडील अँड्रीस पानायीतोऊ हे प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. हिल्टन, डबल ट्री आणि पार्क प्लाझा अशी प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल्सचे ते मालक आहेत.
























































