
पहिल्याच भेटीमध्ये पतीने बलात्कार केला. तसेच ड्रग्सही दिले आणि मला विकण्याचाही प्रयत्न केला, असा खळबळजनक गौप्यस्फोट एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री डेम जोन कॉलिन्स हिने केला आहे. एका डॉक्यूमेंट्रीमध्ये डेम जोन कॉलिन्स हिने हा खुलासा केला आहे. यामुळे ब्रिटनच्या सिनेइंडस्ट्रीमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
डेम जोन कॉलिन्स यांनी आपल्या लग्नांबाबत एक डॉक्यूमेंट्री बनवली आहे. यात तिने पहिला पती मॅक्सवेल रीड याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पहिल्याच भेटीत त्याने माझ्यावर बलात्कार केला आणि ड्रग्ज दिले. मॅक्सवेल त्यावेळी एक प्रसिद्ध चित्रपट स्टार होता. बलात्कारानंतर मला मजबुरीमध्ये लग्न करावे लागले, असे कॉलिन्स यांनी सांगितले.
लग्नानंतर श्रीमंत म्हाताऱ्यांना खूश करण्यासाठी पतीने आपल्याला विकण्याचाही प्रयत्न केलाचा आरोप कॉलिन्सने केले. यासाठी एका रात्रीसाठी मला 10 लाख रुपयांचीही ऑफर देण्यात आली होती. मात्र मी ठामपणे नकार दिला आणि लवकरच त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला असेही कॉलिन्स यांनी सांगितले.
‘त्या’ दिवशी नक्की काय घडलं?
मॅक्सवेलसोबत डेटला गेले त्यावेळी मी व्हर्जिन होते. त्याने मला ड्रींक ऑफर केली. मी फ्रेश होऊन आल्यानंतर त्याने मला रम आणि कोक मिक्स करून पिण्यास सांगितले आणि काही पुस्तके वाचण्यासाठी दिली. ड्रग्समुळे मला काही कळेनासे झाले आणि याचा फायदा घेत त्याने माझ्यावर रेप केला, असे कॉलिन्स यांनी सांगितले.
View this post on Instagram
कॉलिन्स यांनी (वय – 88) पाच लग्न केली आहेत. मॅक्सवेल रीडनंतर त्यांनी ब्रिटिश अभिनेता अँथनी न्यूलीशी विवाह केला. हे लग्नही फार काळ टिकले नाही. यानंतर त्यांनी रॉन कास, पिरट होल्म आणि पर्सी गिब्सन अशी आणखी तीन लग्न केली.



























































