मुलासोबत फिरायला गेलेली अभिनेत्री तलावात बुडाली, पोलिसांकडून शोध सुरू

2695

मुलाला फिरायला घेऊन गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री नया रिवेरा ही तलावात बुडाली आहे. पोलीस सध्या तिचा शोध घेत आहे. नया ही मुलासोबत तलावात बोटिंग करत होती मात्र बोटीमध्ये तिचा मुलगा एकटाच आढळून आला असून पोलिसांनी नयाचा शोध सुरू केला आहे.

actress-drawn

नया रिवेरा हिने अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केले आहे. नया हिला चार वर्षांचा मुलगा असून पतीसोबत तिचा घडस्फोट झाला आहे. नया तिच्या मुलाला घेऊन कॅलिफोर्निया लेकमध्ये बोटिंग करायला गेली. तिथे जायच्या आधी तिने सोशल मीडियावर त्यांचा फोटोही शेअर केला. मात्र काही वेळाने एका दुसऱ्या बोटमधील पर्यटकांना बोटीत नयाचा मुलगा एकटाच दिसला. त्यामुळे त्यांनी पोलिसांना कळवले. तेव्हा त्या मुलाने आई पाण्यात पडली असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी नयाचा शोध सुरू केला आहे. मात्र 24 तास उलटून गेले असून अद्याप नयाचा काहीच पत्ता लागलेला नाही. वेंचुरा शेरिफ पोलीस व बचाव पथक तिचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या