
अनेक मालिकांमध्ये झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री नुपूर अलंकार हिने संन्यास घेतला आहे. नुपूर आता कायम एका संन्यासासारखे भगवे वस्त्र घालून राहते. तसेच तिने मुंबई देखील सोडली असून ती आता हिमालयात निघाली आहे. नुपूरने बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे.
View this post on Instagram
”मी आधीपासूनच एक धार्मिक व्यक्ती होते. या फेब्रुवारी महिन्यात मी संन्यास घेतला. खरंतर त्याला उशीरच झाला. माझा भाऊ अफगाणिस्तानात अडकला होता. त्याच्या सुटकेसाठी मी प्रयत्न करत होते. त्यामुळे हा निर्णय घ्यायला मला वेळ लागला. मात्र आता मी संन्यासाचे आयुष्य जगत आहे. विविध धार्मिक स्थळांना भेट देत आहे. माझे मुंबईतील घर मी भाड्याने दिले असून त्या पैशाने मी माझा प्रवासाचा व माझ्या गरजांचा खर्च भागवत आहे. मी आता अत्यंत साधे आयुष्य जगत आहे. लॉकडाऊनमध्ये माझी आई वारली त्यानंतर मी सर्व जबाबदारीतून मुक्त झाले. त्यानंतर जेव्हा एकटी होते तेव्हा मला नेमके काय हवे आहे ते मला उमगले, असे नुपूर अलंकारने या मुलाखतीत सांगितले.
View this post on Instagram
नुपूर अलंकार हिने शक्तीमान, घर की लक्ष्मी बेटीयाँ अशा एकूण 157 मालिकांमध्ये काम केले आहे. तर राजाजी, सावरियाँ, सोनाली केबल यासारख्या दहा चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. नुपूरने 2002 मध्ये अलंकार श्रीवास्तव या अभिनेत्यासोबत लग्न केले होते. मात्र कालांतराने ते दोघे वेगळे राहू लागले.




























































