अनुराग कश्यपवर मी टूचा आरोप करणारी अभिनेत्री पायल घोष आरपीआयमध्ये सामील होणार

दिग्दर्शक आणि अभिनेता अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करणारी अभिनेत्री पायल घोष रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षात सामील होणार आहे. गेल्या काही दिवसांत याची चर्चा सुरू होती. आता जाहिररित्या पायल पक्षात सामील होणार आहे.

महिला विभागाचे उपाध्यक्षपद मिळण्याची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार पायल घोषला रिपब्लिक पार्टि ऑफ इंडियाच्या महिला विभागाचे उपाध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. घोष सोबत तिचे वकील ही पक्षात प्रवेश घेणार आहे. त्यांना वकील विभागाचे उपाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.

अनुराग कश्यपवर केले होते मी टू चे आरोप

पायल घोषाने अनुराग कश्यपवर मी टू चे आरोप केले होते. या प्रकरणी पायलने पोलिसांत धाव घेत ओशिवरा पोलीस स्थानकात तक्रारही दाखल केली होती. अनुराग कश्यपने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

आठवले यांनी दिला होता पाठिंबा

केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री आणि आरपीआय चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पायल घोष हिला पाठिंना दिला होता. आठवले यांनी पायलची भेट घेतली होती. इतकेच नाही तर पायलसोबत राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेटही घेतली होती. पायलने आपल्याल्या सुरक्षा मिळावी अशी मागणीही केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या