गुणपत्रिकेवर चक्क मल्याळम अभिनेत्रीचा फोटो; बिहारमधील अजब प्रकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमध्ये अजब प्रकार घडला आहे. एका परीक्षार्थीने परीक्षा अर्जावर चक्क मल्याळम अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिचा फोटो लावला आणि तो पास झाला. यानंतर त्याला जी गुणपत्रिका मिळाली त्यावरही या अभिनेत्रीचा फोटो आहे. ही गुणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे बिहार बोर्ड अडचणीत आले आहे.

हृषीकेश कुमार असे या परीक्षार्थीचे नाव असून तो जहानाबाद जिल्ह्यातील आहे. त्याच्या 2019च्या माध्यमिक शिक्षक पात्रता परीक्षेच्या फॉर्मवर अभिनेत्रीचा फोटो आहे. या प्रकरणात विद्यार्थाने मुद्दाम अभिनेत्रीचा फोटो लावल्याचा आरोप करत त्याला नोटीस पाठवण्यात आली आहे. त्याचबरोबर त्याचा निकालही रद्द करण्यात आला.

marksheet

बिहार शैक्षणिक महामंडळाने सर्व परीक्षार्थींना अर्जातील चुका सुधारण्याची संधी दिली होती. मात्र तरीही हृषीकेशने बदल केला नाही. त्यामुळे त्याचा फोटो तसाच राहिला. त्यामुळे ऍडमीट कार्डवरही तसाच फोटो छापून आला. याच कार्डावर तो परीक्षा देऊन आला. गुणपत्रिका व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेला आलं.