पूजा सावंतकडे लगीनघाई, बॉयफ्रेंड सिद्धेशसोबत उरकला साखरपुडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री पूजा सावंत ही तिचा बॉयफ्रेंड सिद्धेश चव्हाणसोबत लग्न करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच शुक्रवारी पूजाने सिद्धेशसोबत साखरपुडा केला. या सोहळ्यासाठी पूजा पारंपारिक रित्या हिरवी साडी नेसून तयार झाली होती. हिरवी साडी, नाकात नथ अशा पारंपारिक वेषात पूजा सुंदर दिसत होती.

साखरपुड्यांतर पूजा व सिद्धेशने त्यांचा पेहराव बदलला. पूजाने सफेद रंगाचा लेहेंगा तर सिद्धेशने सफेद रंगाची शेरवाणी घातली होती. या दोन्ही पेहरावांमध्ये दोघेही अतिशय सुंदर दिसत होते. सोहळ्यादरम्यान दोघांनीही एकत्र मीडियासमोर हजेरी लावत चाहत्यांना सुखद धक्का दिला.