
मराठीतील गोड चेहऱ्याच्या अभिनेत्रींमध्ये रेशम टिपणीसचं नाव हमखास घेतलं जातं. तिच्या बोल्ड वागण्यामुळे ती कायम इंडस्ट्रीमध्ये चर्चेत राहिली. रेशमचे संजीव सेठसोबतचे लग्न असो किंवा तिचे बिग बॉसच्या घरात राजेश श्रृंगारपुरेसोबत जुळलेले सूत असो या सर्वाचीच चर्चा झाली होती. गेल्या काही वर्षांपासून रेशम ही संदेश किर्तीकर नावाच्या व्यक्तीला डेट करत आहे. रेशमने कधीच तिचे हे नाते लपवले नाही. नुकतीच बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने या नात्याविषयी खुलेपणाने सांगितले.
”मी गेल्या सात वर्षांपासून संदेशसोबत नात्यात आहे. एकाअर्थी ते लिव्ह इन रिलेशनशिपसारखंच आहे. संदेश माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर राहतो. माझी मुलं आता मोठी झाली आहेत. ती त्यांच्या त्यांच्या आयुष्यात व्यस्त असतात. त्यामुळे कधी मी संदेशच्या घरी तर कधी माझ्या घरी राहते’, असे रेशम सांगते.

संदेश व रेशम लग्न करणार असल्याची चर्चा देखील गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या चर्चांना देखील रेशमने कायमचा फुलस्टॉप लावला आहे. ”खरं सांगू तर आता काही लग्न करायची इच्छा उरलेली नाही. आम्हाला काही मुलं जन्माला घालायची नाहीत. मग लग्न करण्याचं तसं काही कारणच नाही. आमच्यात सर्व काही व्यवस्थित सुरू आहे. मला लग्न करून ते बिघडवायचं नाही’, असे रेशमने सांगितले.

रेशम टिपणीस हिने 1995 साली सहकलाकार संजीव सेठ याच्यासोबत लग्न केले होते. संजीव रेशमपेक्षा 12 वर्षांनी मोठा होता. त्यांना मानव आणि रिशिका ही दोन मुलं देखील आहेत. लग्नाच्या 12 वर्षानंतर रेशम व संजीव वेगळे झाले.
View this post on Instagram
रेशम ही सध्या पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेत द्वारकाबाईची भूमिका साकारत आहे. तिची ही नकारात्मक भूमिका आहे. ‘मी आतापर्यंत कायम कॉमेडी भूमिका केल्या आहेत. पण मला खलनायिकेची भूमिका साकारायला आवडते. पण एखाद्याला हसवणं हे सर्वात कठिण काम आहे’, असे रेशम सांगते.




























































