श्रीदेवींची ऑनस्क्रीन बहीण कालवश, ज्येष्ठ अभिनेत्री सुजाता कुमार यांचं निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

श्रीदेवी यांनी पुनरागमन केलेल्या इंग्लिश विंग्लिश या चित्रपटात त्यांच्या बहिणीची भूमिका करणाऱ्या सुजाता कुमार यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. त्या मेटास्टॅटिक कर्करोगाने ग्रस्त होत्या. मुंबई येथील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सुजाता यांची बहीण अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी ट्वीट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

सुजाता यांना आतापर्यंत इंग्लिश विंग्लिश, रांझणा, गोरी तेरे प्यारमें सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सुजाता हॉटेल किंगस्टन, बॉम्बे टॉकिंग, २४ सारख्या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या होत्या.

summery- actress sujata kumar passed away