कर्नल वेंगसरकरांच्या भूमिकेत रुबाबदार दिसतोय आदिनाथ कोठारे! पाहा पोस्टर

1040

हिंदुस्थानच्या क्रिकेट इतिहासातलं एक मानाचं पान म्हणजे 1983चा विश्वचषक. या विश्वचषकावर आधारित 83 हा बहुप्रतिक्षित चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. याचं कारण, या चित्रपटात हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या भूमिकेतील कलाकारांचे लूक एकापाठोपाठ एक व्हायरल होत आहेत. अजून एका मराठमोळ्या क्रिकेटपटूचा लूक व्हायरल झाला आहे.

कर्नल अशी उपाधी असलेल्या ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत अभिनेता आदिनाथ कोठारे झळकत आहे. त्याचा या चित्रपटातील लूक व्हायरल झाला आहे. या पोस्टरवर आदिनाथ वेंगसरकरांच्या भूमिकेत अतिशय रुबाबदार पद्धतीने फलंदाजी करताना दिसत आहे. दिलीप वेंगसरकर हे 1983च्या विश्वचषक खेळणाऱ्या हिंदुस्थानी संघाचे एक सदस्य होते. संकटकाळी हमखास धावून येणारा फलंदाज अशी त्यांची ओळख होती. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण शैली आणि तडाखेबाज फलंदाजीसाठी वेंगसरकर ओळखले जाते.

या बहुप्रतिक्षित चित्रपटामध्ये रणवीर सिंह कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. ’83’ या चित्रपटाद्वारे हिंदुस्थानच्या पहिल्या विश्वविजयाचे स्पप्न पडद्यावर साकारण्यात येत आहे. या चित्रपटासाठी रणवीर सिंह आणि टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. या चित्रपटात ताहीर भसीन, जीवा, अॅम्मी विर्क, जीवा, साहिल खट्टर, धैर्य करवा, दिनकर शर्मा, जतीन सारना, हॅरी संधू, आर. बद्री, पंकज त्रिपाठी, चिराग पाटील अशी स्टारकास्ट असणार आहे. रणवीर सिंग याची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोण ही देखील कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. कबीर खान दिग्दर्शित 83 हा चित्रपट 10 एप्रिल 2020 रोजी प्रदर्शित होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या