
मुंबई इंडियन्सने सलग दुसऱया वर्षी आयपीएल स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई इंडियन्सच्या देदीप्यमान यशाचे काwतुक करतानाच अभिनंदनही केले.
मुंबई इंडियन्सने मंगळवारी रात्री दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केल्यानंतर पाचव्यांदा विजेतेपदाच्या ट्रॉफीवर नाव कोरले. यानंतर आदित्य ठाकरे यांनी संस्मरणीय कामगिरी करणाऱया मुंबई इंडियन्स संघाच्या खेळाची स्तुती केली. यावेळी ते म्हणाले, अभिनंदन मुंबई पलटण… आम्हाला तुमचा अभिमान आहे!































































