
जोगेश्वरीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्य़ा `आय लव जोगेश्वरी’ सेल्फी पॉइंट व सुशोभित भिंत, तसेच शिवसेना शाखा क्र.52 चे (गोकुळधाम) नूतनीकरण, नागरिकांसाठी ग्रंथालय आणि योगा केंद्र, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र आदी विकासकामांचे पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.
शिवसेना आमदार, माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या संकल्पनेतून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील इस्माईल युसुफ महाविद्यालयाच्या भिंतीलगत `आय लव जोगेश्वरी’ सेल्फी पॉइंट उभारला आहे. येथील भिंतीवर आकर्षक भित्तीचित्रेही चितारली आहेत. तसेच गोरेगाव (पूर्व) येथील गोकुळधाम येथील शाखा क्रमांक 52 चे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले असून या ठिकाणी ग्रंथालय, योगा केंद्र, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रही उभारण्यात आले आहे. या सगळ्या वास्तू आमदार तसेच माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आल्या आहेत.
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या सर्व विकासकामांचे उद्घाटन झाले, याप्रसंगी शिवसेनेचे खासदार व नेते गजानन कीर्तिकर, आमदार व विभागप्रमुख सुनील प्रभू, उप महापौर सुहास वाडकर, नगरसेवक बाळा नर, प्रवीण शिंदे, विश्वनाथ सावंत, रचना सावंत, शालिनी सावंत, जयवंत लाड, कैलाशनाथ पाठक, जितेंद्र वळवी, बाळा साटम, भाई मिर्लेकर, बावा साळवी, मंदार मोरे, अमर मालवणकर, बाळा तावडे, संदीप गाढवे, अमित पेडणेकर, ईस्माइल युसुफ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्वाती व्हावळ आदी उपास्थित होते.



























































