आदित्य ठाकरे यांची आज नाशिकमध्ये सभा

सामना प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ उद्या शुक्रवारी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना नेते, उत्तर महाराष्ट्र विभागीय नेते, खासदार संजय राऊत हेही हजर राहणार आहेत.

शिवसेना, भाजपा, रिपाइं, रासप, शिवसंग्राम महायुतीचे शिवसेना उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. त्यांच्या प्रचारार्थ उद्या शुक्रवारी, 26 एप्रिल रोजी गोदाकाठी यशवंतराव महाराज पटांगणावर सायंकाळी 5 वाजता आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, उपनेते बबनराव घोलप, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दादा जाधव, प्रकाश लोंढे, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार योगेश घोलप, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, लक्ष्मण सावजी, विनायक पांडे, दत्ता गायकवाड, अजय बोरस्ते, दिनकर पाटील, विलास शिंदे, सत्यभामा गाडेकर, दीपक दातीर, राहुल ताजनपुरे, महेश बडवे, सचिन मराठे, राहुल दराडे, योगेश बेलदार, बाळासाहेब कोकणे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते हजर राहणार आहेत.

जबरदस्त
उत्तर-पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जबरदस्त रोड शो केला. भांडुपच्या मंगतराम पेट्रोल पंपपासून रोड शो सुरू झाला. क्वारी रोडमार्गे, शिवाजी तलाव, जंगलमंगल रोडमार्गे शिवसेना मध्यवर्ती शाखेपर्यंत रोड शो झाला. या रोड शोला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रोडच्या दोन्ही बाजूला युवा मतदार मोठय़ा संख्येने उभे होते. यावेळी आमदार सुनील राऊत, आमदार अशोक पाटील, विभागप्रमुख रमेश कोरगावकर तसेच विभागातील सर्व नगरसेवक उपस्थित होते.