
हिंदुस्थानच्या नौदलाच्या शौर्याचे साक्षीदार असलेले सी हॅरीयर विमान आता मुंबईकरांनाही पाहता येणार आहे. वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्डवर पालिकेच्या माध्यमातून बसविण्यात आलेल्या या विमानाचे लोकार्पण गुरूवारी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुंबईच्या पर्यटनात भर पाडण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून वाहतूक बेटांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. या उपक्रमात नौदलाचे हे विमान आणले गेले आहे. या विमानाचे औपचारीकरीत्या हस्तांतरण पत्र हिंदुस्थानी नौदलाचे फ्लॅग ऑफिसर ऑफ महाराष्ट्र श्रीनिवासन यांच्या हस्ते महाराष्ट्राचे पर्यावरण-पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे बॅण्डस्टॅण्डवर आयोजित छोटेखानी समारंभात सुपूर्द करण्यात आले.
Words aren’t enough to describe the feeling as I unveiled the Sea Harrier monument of the Indian Navy at Bandra Bandstand today. Thank you @Asif_Zakaria ji for this initiative that will remind us of the valour of the uniform, and inspire many more to join them. pic.twitter.com/YU4M9HqSaI
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 3, 2020
यावेळी स्थानिक नगरसेवक आसिफ झकेरिया, उपायुक्त पराग मसुरकर, सहायक आयुक्त विनायक विसपुते आदी मान्यवर उपस्थित होते. हिंदुस्थानी नौदलातून निवृत्त झालेले लढाऊ विमान हे मुंबईला भेट म्हणून मिळाले आहे.
मुंबईसाठी ही अनोखी भेट असून यामुळे मुंबईच्या पर्यटन सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. हे विमान वांद्रे बॅण्डस्टॅण्ड येथील वाहतूक बेटावर ठेवण्यात आले आहे. हिंदुस्थानी नौदलाकडून हे विमान औपचारीकरीत्या मुंबईला आज प्रदान करण्यात आले.
मुंबईच्या पर्यटनात भर
हिंदुस्थानी नौदलातून निवृत्त झालेल्या ‘आयएनएस विराट’ युद्धनौकेवर हे विमान तैनात होते. हे विमान महानगरपालिकेने बॅण्डस्टॅण्ड येथील वाहतूक बेटावर बसविले आहे. आता सामान्य नागरिकांनाही हे विमान पाहता येणार आहे.
प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाला दरवर्षी या परिसरात शालेय विद्यार्थ्यांचे संचलन होत असते. त्यामुळे या परिसरात हिंदुस्थानचे सामर्थ्य दाखविणारे हे विमान ठेवण्यात आले आहे.



























































