श्री क्षेत्र नृसिंहवाडीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी घेतले दत्त दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी दुपारी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे येऊन दत्त दर्शन घेत प्रार्थना केली. शिवसेनेच्या शिव संवाद यात्रेअंतर्गत ते जयसिंगपूर येथे सभेसाठी आले होते. यानंतर त्यांनी अचानक श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे येऊन दत्त दर्शन घेतले. यामुळे पोलीस प्रशासन सुरक्षा रक्षक यांची चांगली तारांबळ उडालेली दिसत होती.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे येणार याची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्यानंतर परिसरातील शेकडो नागरिक तसेच महिला वर्गाने ठाकरे यांना पाहण्यासाठी व भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी आपण कोणत्याही राजकीय कार्यक्रमाकरिता आलो नसून केवळ दत्त महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो असल्याचे नमूद केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

दत्त मंदिरात दुपारी दोनच्या दरम्यान ते आले होते. त्यांनी दत्त दर्शन घेत श्री चरणी प्रार्थना केली. यावेळी श्री चरणी शशिकांत पुजारी, स्वानंद गेंडे आधी पुजारी मंडळी करवी आरती करण्यात आली यावेळी दत्त देव संस्थांची विश्वस्त सचिव व संजय पुजारी उपस्थित होते. तर ठाकरे यांचे समवेत सिद्धिविनायक ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष आदेश बांदेकर तसेच माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, तालुकाप्रमुख वैभव उगले, युवासेना प्रमुख प्रत्येक धनवडे, सतीश मलमे, निलेश तवंदकर, आधी शिवसैनिक उपस्थित होते. मंदिर मार्गावर आदित्य ठाकरे यांना भेटण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. आदित्य ठाकरे प्रत्येकाला अभिवादन करत हस्तंदोलन करत नागरिकांशी संवाद साधत होते.