निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवले; फडणवीसांना जामीन, पुढील सुनावणी 30 मार्चला

539

निवडणूक शपथपत्रात गुन्हे लपविल्याप्रकरणी कायदेशीर अडचणीत आलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जामीन मिळाला आहे. नागपूर न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर फडणवीस यांना जामीन मंजूर केला असून या प्रकरणी पुढील सुनावणी 30 मार्च रोजी होणार आहे.

भाजप नेते फडणवीस यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात 1996 ते 1998 दरम्यानच्या दोन फौजदारी गुह्यांची माहिती लपवल्याचा आरोप वकील सतीश उके यांनी केला होता. या प्रकरणी फडणवीस यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी उके यांनी केली होती. नागपूर न्यायालयात उके यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनाकणीला हजर राहण्यासाठी फडणवीस यांना समन्स बजाकण्यात आले होते. त्यानुसार फडणवीस गुरुवारी न्यायालयात हजर झाले. त्यांच्या वतीने ऍड. सुनील मनोहर यांनी बाजू मांडली तर सतीश उके यांनी विरोधात युक्तिवाद केला. सुनावणीअंती न्यायालयाने फडणवीस यांना जामीन मंजूर केला.

राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वात सत्ता असताना उके यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपविल्याप्रकरणी केलेल्या तक्रारीची फारशी गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही. हे प्रकरण उच्च न्यायालयात आले असता या प्रकरणात वनिष्ठ न्यायालयात खटला चालविण्याची गरज नसल्याचा निकाल देण्यात आला होता. त्याविरोधात वकील सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाक घेतली होती. त्यावर गेल्या ऑक्टोबरमध्ये उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केला होता. या निकालावर फडणवीस यांनी फेरविचार याचिका दाखल केली असून यावरील निकाल सर्वोच न्यायालयाने सोमवारी राखून ठेवला आहे.

खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्यास सहा महिने तुरुंगवास किंवा दंड

ऑक्टोबर 2019 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर जिल्हा न्यायदंडाधिकाऱयांनी लोकप्रतिनिधी कायद्याच्या (आर.पी. ऍक्ट) कलम 12-ए अन्कये फडणवीस यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू करण्याची मागणी वकील सतीश उके यांनी केली आहे. यानुसार खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केले किंवा प्रलंबित फौजदारी खटल्यांबाबत माहिती लपकिली तर त्या क्यक्तीस सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

या सगळ्यामागे कोण हे मला चांगलेच माहीत – फडणवीस

माझ्याकरील सर्व गुन्हे हे जनतेसाठी केलेल्या आंदोलनांचे गुन्हे आहेत. वैयक्तिक कारणातून एकही गुन्हा आजवर माझ्यावर दाखल झालेला नाही. त्यामुळे गुन्हे लपविण्याचा प्रश्नच येत नाही. ज्या दोन गुन्हय़ांबद्दल आरोप केले जात आहेत ते निवडणुकीवर परिणाम करणारे गुन्हे नव्हते. न्यायालयासमोर मी माझे म्हणणे मांडेन. न्यायालयाकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र या सगळ्यामागे कोण आहे हेही मला चांगलेच माहीत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या