मोदी-शहा यांचं मॉडेल स्पष्ट आहे, जेव्हा जनतेचा पाठिंबा मिळत नाही, तेव्हा मतदार यादी बदला – जयराम रमेश

मोदी-शहा यांचं मॉडेल स्पष्ट आहे, जेव्हा जनतेचा पाठिंबा मिळत नाही, तेव्हा मतदार यादी बदला, अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केली आहे. काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा “मतांची चोरी” या मुद्द्यावर प्रेझेंटेशन दिले. यावेळी त्यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत २५ लाख मतांची चोरी झाल्याचा आरोप त्यांनी केला. यावर भाष्य करताना X वर एक पोस्ट करून जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर हे टीका केली आहे.

X वर पोस्ट करत जयराम रमेश म्हणाले आहेत आहेत की, “राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेने हिंदुस्थानातील सर्वात मोठ्या निवडणूक घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. हरियाणात २५ लाख बोगस मतदार भाजपच्या माहिती आणि निवडणूक आयोगाच्या मूक संमतीने तयार केले गेले.”

ते म्हणाले, “मोदी-शहा यांचं मॉडेल स्पष्ट आहे, जेव्हा जनतेचा पाठिंबा मिळत नाही, तेव्हा मतदार यादी बदला. द्वेषपूर्ण भाषणांवर मौन बाळगणारा हाच निवडणूक आयोग अचानक सक्रिय होतो, तो खऱ्या मतदारांना यादीतून काढून टाकतो आणि बोगस मतदारांना जोडतो. ही मतदार यादीची दुरुस्ती नाही, ही मतांची चोरी आहे.”