चार वर्षांचा असताना नाकात फसलं होतं नाणं, दहा वर्षांनी आलं बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लहान मुलांना नाका,तोंडात काहीही घालायची सवय असते.असेच खेळत असताना ब्रिटनमधील चार वर्षांच्या मुलाने दहा वर्षापूर्वी नाकात नाणे घातले होते. मात्र दहा वर्षांनी शिंकेद्वारा ते नाणं नाकातून बाहेर पडलं आहे.

उमेर कमर असे त्या मुलाचे नाव आहे.उमेर चार वर्षांचा असताना त्याच्या नाकात हे नाणं फसलं होतं. मात्र त्याचा काही त्रास न झाल्याने तो विसरलाही होता. त्यावेळी बऱ्याच डॉक्टरांना दाखवण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनाही त्याच्या फसलेल्या नाण्याबाबत काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे कदाचित नसावे असेच समजले. मात्र अलिकडे उमेरच्या नाकात आधीपेक्षा जास्त वेदना होऊ लागल्या होत्या. अखेर तो वरच्या खोलीत गेला आणि दोन्ही कानात त्याने कापूस घातला. त्यानंतर त्याने डावी नाकपुडी बंद केली आणि उजव्या नाकपुडीतून जोरात श्वास सोडला. त्याच दरम्यान त्याला शिंक आली आणि नाणं बाहेर पडलं.

मुलाची आई नमसीनने सांगितले की, तो जवळपास 15 मिनीटांनी खाली आला, काही वेळ शांत उभा राहिला. त्यानंतर त्याने सांगितले की नाकात फसलेले नाणं बाहेर आले. त्यावर त्याच्या आईने त्याला विचारले, तू खरं बोलतोयसं का? कारण तिलाही यावर विश्वास बसत नव्हता. त्यांनाही ही गोष्ट माहित नव्हती.

द सनच्या वृत्तानुसार, ब्रिटनमध्ये सेंट थॉमस रुग्णालयाच्या प्राध्यापक क्लेयर हॉपकिंसने सांगितले की, लहान मुलांना आपल्या नाकात काही ना काही घालायची सवय असते.अशावेळी तो लहान असताना त्याच्या नाकात नाणं गेलं असेल आणि त्यानंतर त्रास होत नसल्याने तो विसरलाही असेल.