
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानच्या संसदेवर दहशतवादी हल्ला केल्याप्रकरणी फाशी देण्यात आलेल्या अफजल गुरूच्या मुलाने सरकारकडे त्याला पासपोर्ट देण्याची मागणी केली आहे. अफजलचा मुलगा गालिब याला परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जायचे असल्याने त्याने सरकारकडे पासपोर्टची मागणी केली आहे.
#WATCH Afzal Guru’s (who was executed in 2013 for his role in 2001 Parliament attack) son Ghalib Guru says, “I appeal that I should get a passport. I also have an Aadhaar card. If I get a passport, I can avail international medical scholarship.” pic.twitter.com/jJZSVht8k8
— ANI (@ANI) March 5, 2019
दहशतवाद्यांच्या कुटुंबांना सरकारी फायदे मिळत नाहीत. त्यांना परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट व्हिसा देखील नाकारला जातो. अफजल गुरुचा मुलगा गालिब याला वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशातील विद्यापीठातून स्कॉलरशिप मिळवायची आहे. त्यासाठी त्याने त्याला पासपोर्ट देण्यात यावा अशी मागणी केली आहे.
‘माझ्यावर दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होण्यासाठी आमच्या गावातील संघटनांतून व पाकिस्तानमधून खूप दबाव होता. पण माझ्या आईने मला त्यापासून लांब ठेवले. आपण भूतकाळातील आपल्या चुकांमधूनच शिकत असतो. माझ्या वडिलांना त्यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करता आले नाही. पण मला माझे शिक्षण पूर्ण करायचे आहे’असे गालिब याने एका इंग्रजी संकेतस्थळाशी बोलताना सांगितले.



























































