एक नारल दिलाय दर्यादेवाला… आगरी गाण्यावर रोहित, पंडय़ा ब्रदर्सचा भन्नाट डान्स

आयपीएलचे काऊंटडाऊन आता सुरू झाले आहे. सगळे संघ तयारीला लागले आहेत. त्यातच मुंबई इंडियन्स संघाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यात मुंबईचे खेळाडू सध्या गाजत असलेल्या ‘एक नारल दिलाय दर्यादेवाला’ या आगरी गाण्यावर ठेका धरताना दिसतायत. या गाण्यावर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मासह सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, पंडय़ा बंधू थिरकताना दिसत आहेत. या व्हिडीओला सोशल मीडियावर चाहत्यांनी भन्नाट प्रतिसाद दिला आहे. खरे तर या व्हिडीओतील गाणे आणि डान्स वेगळा असून चाहत्यांना कोणाची स्टेप जास्त आवडली असा सवाल मुंबईने कॅप्शनमध्ये विचारला आहे. आतापर्यंत दीड लाखाहून अधिक लोकांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या