अतिक्रमणाविरोधात अंबुलगा बु. येथे उपोषण

62

सामना प्रतिनिधी । अंबुलगा बु.

निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु येथील बाजाराच्या राखीव भूखंडावर केलेले अतिक्रमण तात्काळ काढावे, यासाठी गावातील जगदीश सगर व आशिष पाटील हे ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसले आहेत.

अंबुलगा बु. येथील बाजाराच्या भूखंडावरील जाहीर करण्यात आलेली अतिक्रमणे त्वरीत काढण्यात यावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती, परंतु या मागणीची दखलही ग्रामपंचायतीने घेतली नाही. त्यामुळे प्रजासत्ताक दिनादिवशी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

या उपोषणाला प. स. सदस्य वामन भालके, भानुदासराव होरे, उध्दव बिरादार, सुग्रीव सुर्यवंशी, चंद्रकांत होरे, शिवराज सगर, शांतेश्वर पाटील, बालाजी म्हेञे, दत्ता हारंगुळे, हाणमंत सुर्यवंशु, धोंडीराम कांबळे, तुकाराम कांबळे, मनोज सुर्यवंशी, बालाजी मिरखले उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या