विविध मागण्यांसाठी निलंगा येथे शिवसेनेचा रास्ता रोको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । निलंगा

खरीप पेरणीत बियाणे उगवले नसल्याकारणाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. तूर, हरभरा फरकाचे १ हजार रुपये देण्यात आलेले नाहीत. ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी, या आणि इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने निलंगा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

विद्यमान राज्य शासन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नाही. खरीपाचे बियाणे न उगवल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. तूर, हरभरा ऑनलाईन अर्ज करुनही अनेक शेतकऱ्याचा अर्ज घेण्यात आला नाही. तर ज्यांचा घेतला त्यांना फरकाची रक्कम अजून मिळालेली नाही. ही रक्कम आणि पिकविम्याच्या रक्कमेचे त्वरीत वाटप करावे या आणि इतर मागण्यांसाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात सहसंपर्क प्रमुख अभय साळुंके, सुधाकर पाटील, अजित निंबाळकर, उमेश सातपुते, तुराब बागवान, हरी सगरे, गिरीध पात्रे, सुरेंद्र कांबळे, बालाजी वळसांगवीकर, विठ्ठल आदित्य, कुलदीप सुर्यवंशी, किशोर मोहिते, दत्ता मोहळकर, अजिंक्य लोंढे, पृथ्वीराज निंबाळकर, विशाल नेलवाडे, सचिन मोघे, गोपाळ हिबारे, मुकेश सुडे, मालबा घोणसे, मदन बिरादार, विजय होगले, संतोष माने, सतीश जाधव, कोकरे डिगांबर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरीक, शेतकरी, शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.