
केंद्र सरकारने लष्करातील भरतीसाठी जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला प्रचंड विरोध सुरू झाला आहे. बिहारमधील शेकडो तरुण लाठ्याकाठ्या घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. बुधवारी आणि गुरुवारीही ठिकाठिकाणी टायरची जाळपोळ करण्यात आली. हजारोंच्या संख्येने संतप्त तरुण रस्त्यावर उतरले असून अनेक भागात तरुणांनी रेल्वे रुळावर ठिय्या मांडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. यादरम्यान तरुणांनी भबुआ-पाटणा इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लावली. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली असून रेल्वेचे प्रचंड नुकसान झाले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी ‘अग्निपथ’ योजनेची घोषणा केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारी ठिकठिकाणी निदर्शने सुरू झाली. बिहारमध्ये संतापाचा मोठा उद्रेक झाला. आंदोलकांनी बक्सरमध्ये रेल्वे वाहतूक रोखली. त्यानंतर मुझफ्फरपूरमध्ये टायरची जाळपोळ करून रास्ता रोको केले. आरा येथेही आंदोलकांनी मोठा गोंधळ घातला. यावेळी पोलीस आणि जीआरपीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ‘अग्निपथ’ योजना मागे घेण्याच्या मागणीवर ठाम राहिले.
गुरुवारीही तरुण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. जहानाबादमध्ये आंदोलक तरुणांनी पाटणा-गया मार्गावरील पाटणा-गया मेमू रेल्वे रोखली आणि रेल्वे स्थानक परिसरामध्ये जाळपोळ केली. तसेच बक्सर आणि नवादामध्येही रेलरोको करण्यात आला. छपरा जंक्शनमध्ये तरुणांनी तब्बल 12 रेल्वे गाड्यांची तोडफोड केली असून छपरा, गोपालगंज आणि कैमूर येथे तीन रेल्वे गाड्यांना आगही लावली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. आरा रेल्वे स्थानकावरही तरुणांनी दगडफेक केली असून रेल्वे कार्यालयाची तोडफोड केली.
केंद्र सरकारने लष्करातील भरतीसाठी जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला प्रचंड विरोध सुरू झाला आहे. बिहारमधील अनेक रेल्वे स्थानकांवर तरुणांनी हल्ला चढवला असून तोडफोडीसह रेल्वे गाड्यांना आगीच्या हवाली केले. #Agnipath #AgnipathScheme #Agniveers #AgnipathRecruitmentScheme pic.twitter.com/s0y4RUNBkE
— Saamana (@SaamanaOnline) June 16, 2022
तरुणांची अग्निपरीक्षा घेऊ नका – राहुल गांधी
अग्निपथ योजनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. देशातील बेरोजगार तरुणांचा आवाज ऐका. त्यांना अग्निपथवर चालवून त्यांच्या संयमाची अग्निपरीक्षा घेऊ नका, असे ट्विट राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केले आहे.
न कोई रैंक, न कोई पेंशन
न 2 साल से कोई direct भर्ती
न 4 साल के बाद स्थिर भविष्य
न सरकार का सेना के प्रति सम्मान
देश के बेरोज़गार युवाओं की आवाज़ सुनिए, इन्हे ‘अग्निपथ’ पर चला कर इनके संयम की ‘अग्निपरीक्षा’ मत लीजिए, प्रधानमंत्री जी।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 16, 2022
तरुणांचे मनोधैर्य खच्ची करू नका – अखिलेश यादव
बिहारप्रमाणे उत्तर प्रदेशमध्येही तरुणांचा उद्रेक पाहायला मिळत आहे. अग्निपथ योजनेविरोधात तरुण रस्त्यावर उतरल्याने माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही केंद्रावर निशाणा साधला. लष्कराचे कंत्राटीकरण म्हणजे देशाचा आणि खऱ्या देशभक्त तरुणांचा विश्वासघात आहे, असे अखिलेश यादव यांनी ट्विट करून म्हटले.
देश के भावी सैन्य बलों पर बल का दुरुपयोग करके भाजपा सरकार युवाओं का मनोबल गिरा रही है। ‘भारत माता’ का उद्घोष झूठे दिखावे का नहीं; सच्ची देशभक्ति का प्रतीक होना चाहिए।
सेना का ठेकेदारीकरण देश और सच्चे देश भक्त युवाओं के लिए विश्वासघात के समान है।
फ़ौज आउटसोर्स का विषय नहीं है। pic.twitter.com/hSfiHuyV9D
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) June 16, 2022



























































