
सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचे स्वप्न अनेक तरुणांचे असते. अशा या तरुणांचे स्वप्न आता सत्यामध्ये उतरणार असून यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘अग्निपथ’ या योजनेची घोषणा केली आहे. जास्तीत जास्त तरुणांना सैन्यात जाऊन देशसेवा करण्याची संधी मिळावी हा या योजनेमागील उद्देष आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी दुपारी पत्रकार परिषद घेत सरकारच्या मिशन अग्निपथ योजनेची घोषणा केली. यावेळी तिन्ही सैन्यदलाचे प्रमुखही उपस्थित होते. या योजनेद्वारे तरुणांना अग्निवीर म्हणून आर्मफोर्समध्ये सेवेत समाविष्ट करुन घेतले जाईल, असे संरत्रण मंत्र्यांनी स्पष्ट केले.
जास्तीत जास्त तरुणांना लष्करात सामील करुन घेण्यासाठी ही विशेष योजना आणल्याचे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. या योजनेद्वारे सशस्त्र दलात तरुणांना संधी दिली जाणार आहे. या योजनेमुळे रोजगाराच्या संधी वाढणार असून लष्करालाही नवीन उर्जा मिळण्यास मदत होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
Under the ‘Agnipath’ scheme, efforts are to create a youthful profile of the Armed forces. It would help to train them for new technologies & also improve their health levels. This scheme will increase employment opportunities with new skills in different sectors: Rajnath Singh pic.twitter.com/ypemJyxf9i
— ANI (@ANI) June 14, 2022
‘अग्निपथ’ योजनेद्वारे दरवर्षी 50 हजार अग्निवीरांची भरती केली जाणार आहे. शॉर्ट टर्म सर्विससाठी तरुणांची नियुक्ती केली जाईल. तरुणांना चार वर्ष सेवेत समाविष्ट करुन घेतले जाईल. या योजनेद्वारे लष्करामध्ये भरती होणाऱ्या तरुणांना चांगले पॅकेजही दिले जाईल, तसेच चार वर्षांच्या सेवेनंतर नोकरी सोडल्यास सेवा निधी पॅकेजही दिले जाईल, असेही संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.
Delhi | The Cabinet Committee on Security has taken a historic decision today to approve the transformative scheme of ‘Agnipath’. Under this, Indian youth would be granted an opportunity to get inducted into the Armed services: Defence Minister Rajnath Singh pic.twitter.com/eUv2SyQBPw
— ANI (@ANI) June 14, 2022
कोणाला मिळणार संधी आणि पॅकेज किती?
दरम्यान, 18 ते 21 वर्ष वयोगटातील तरुणांना या योजनेद्वारे लष्करामध्ये सेवा करण्याची संधी मिळणार आहे. या तरुणांना 10 आठवडे ते 6 महिन्यांपर्यंत ट्रेनिंग दिले जाईल. अग्निपथ योजनेद्वारे भरती होणाऱ्या तरुणांना 4.76 लाख वार्षिक पगार मिळेल. तर चौथ्या वर्षांपर्यंत या तरुणांचे पॅकेज 6.92 लाखांपर्यंत पोहोचले. यासह अन्य भत्तेही मिळतील. तसेच चार वर्षाच्या नोकरीनंतर 11.7 लाखांचा सेवा निधीही मिळणार आहे. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.
Model is based on all-India merit-based selection process. We are looking at the best to serve the armed forces between the ages of 17.5 to 21 years. Once selected, agniveers will serve for 4 years with us: Lt Gen Anil Puri, Additional Secretary, Dept of Military Affairs pic.twitter.com/dLVjPucZSa
— ANI (@ANI) June 14, 2022




























































