
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर पाचजण बिनविरोध निवड झाली आहे. सिनेट सदस्यांमधून ही निवड झाली आहे. पदवीधर प्राचार्य व प्राध्यापक प्रवर्गातील तीन जागांचे चित्र शुक्रकारी (दि. 23) स्पष्ट होणार आहे. त्या दिवशी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
सोलापूर विद्यापीठाच्या सिनेटसह इतर सदस्यांसाठी काही दिवसांपूर्वी निवडणूक पार पडली. त्यानंतर विजयी सदस्यांमधून आठ सदस्यांची निवड व्यवस्थापन परिषदेसाठी केली जाते. त्यात पदवीधर, प्राचार्य, संस्थाचालक व प्राध्यापक प्रवर्गातून प्रत्येकी दोन सदस्य निवडले जातात. संस्था प्रतिनिधीतून सिनेट सदस्य म्हणून विजयी झालेल्या पद्मजादेवी मोहिते-पाटील व महादेव कमळे यांची व्यवस्थापन परिषदेवर बिनविरोध निवड झाली. तसेच, सिनेट सदस्य राजाभाऊ सरवदे यांची पदवीधरमधून, तर प्राचार्य प्रकर्गातून भीमाशंकर भांजे यांचीही क्यकस्थापन परिषदेकर निकड झाली. त्यासंबंधीची घोषणा 24 डिसेंबर रोजी विद्यापीठाकडून अधिकृतपणे केली जाणार आहे. आता उर्वरित तीन जागांचे चित्र दोन दिवसांत स्पष्ट होईल. या निवडणुकीत आता कोण विजयी होणार, याची उत्सुकता आहे. व्यवस्थापन परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी व विद्यापीठ विकासाचे महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे सदस्य निवडीची सर्वांनाच उत्सुकता आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सर्वोच्च सभागृह व्यवस्थापन परिषदेवरील आठ जागांची निवड प्रक्रिया आता सुरू झाली आहे. संस्था प्रतिनिधीतून दोन अर्ज आल्याने त्या दोन्ही जागा बिनविरोध झाल्या. पण, पदवीधरमधून खुल्या प्रवर्गातून ‘सुटा’तर्फे प्रा. सचिन गायकवाड यांच्या विरोधात ‘अभाविप’कडून चन्नकीर बंकूर, यतिराज व्हनमाने व अपक्ष म्हणून गणेश डोंगरे यांनी अर्ज केले आहेत. प्राचार्य प्रवर्गातून एका जागेसाठी आता डॉ. राजेंद्र शेंडगे व डॉ. एन. बी. पवार यांचे अर्ज आहेत. तसेच, प्राध्यापक प्रवर्गातून डॉ. माया पाटील, ‘सुटा’चे प्रा. समाधान पवार व विकास मंचचे प्रा. वीरभद्र दंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यातील आता कोण माघार घेणार, हे 24 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. या तीन जागांसाठी निवडणूक लागणार की बिनविरोध होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



























































