
सामना प्रतिनिधी। खेड
शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी नगर पालिकेने तातडीने जागा द्यावी या मागणीसाठी नगर परिषदेवर नागरिकांनी मोर्चा काढला.
येथील अण्णाभाऊ साठे नगर येथून निघालेला मोर्चा आझाद चौक, मुख्य बाजारपेठ येथून बसस्टॅण्ड मार्गे नगर परिषदेवर धडकला. नगर परिषद कार्यालयाच्या शेजारी नांदेड रोड बाजूस असलेली खुल्या जागेत सर्व जयंती सोहळे व धार्मिक कार्यक्रम होतात. याच ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी जागा देण्याची मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन नगराध्यक्षा आश्विनी कासनाळे, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांना देण्यात आले. यावेळी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय बैठकीत घेवून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला जागा देण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
या मोर्चात डॉ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी, गफारखान पठाण, मुकुंद वाघमारे, विनोद नामपल्ले, संजय डावरे, सुनिल डावरे, जगदीश वाघमारे, पांडूरंग वाघमारे, सुरेश कसबे, माधव कसबे, आनंद शिंदे, दशरथ घोणे, स्वप्नील गायकवाड, तिरूपती गायकवाड, अविनाश डावरे, बालाजी वाघमारे, मनोज कांबळे, शुभंम डावरे, प्रसाद डावरे, कैलास डावरे, किशोर मोरे, पृथ्वी डावरे, मोहम्मद पठाण, शहारूख पठाण, नूर मोहम्मद, सय्यद नौशाद आदींनी पुढाकार घेतला.
































































