सीआयएमएस ऍपचा सराईतांवर ‘वॉच’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता गुन्हेगार त्याठिकाणी वास्तव्यास आहे की नाही, याची माहिती सीआयएमएस ऍपच्या माध्यमातून घेण्यात आली. त्यानंतर बुधवारी नगर जिह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत असणाऱया गुन्हेगारांची एकाच वेळेला घरी जाऊन माहिती घेण्यासाठी शोधमोहीम राबविण्यात आली. यामध्ये 193 गुन्हेगार हे घरामध्ये आढळून आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

नगर जिह्यामधील सराईत 577 गुन्हेगारांची ‘सीआयएमएस पोर्टल’वर नोंद केलेली आहे. त्यांचे पत्ते गुगल मॅपच्या रेकॉर्डवर नोंदवून इतर माहितीही संकलित केली आहे. नगर जिल्हा पोलीस दलाने मागील दोन महिन्यांपूर्वी हे ऍप विकसित केले आहेत. या ऍपमध्ये संबंधित गुन्हेगाराची सर्व माहिती यामध्ये देण्यात आली आहे. तसेच हे गुन्हेगार कुठे राहतात हे ही ऍपच्या माध्यमातून कळू शकेल, असे हे ऍप विकसित केले आहे.

सराईत गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी तसेच हे गुन्हेगार नेमके घरी आहेत का नाहीत किंवा ते अन्य ठिकाणी गेले आहेत का? याची पडताळणी करण्यासाठी बुधवारी नगर जिह्यातील सर्व तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये असणाऱया गुन्हेगारांचा या ऍपच्या माध्यमातून शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सुमारे तीस तास हे शोधकार्य सुरू होते. जिह्यामध्ये 378 गुन्हेगारांच्या घरापर्यंत पोलीस पोहोचले असून, यापैकी 193 आरोपी हे घरांमध्ये असल्याचे निदर्शनास आले. 184 आरोपी घरी नसल्याचे आढळून आले आहे. याशिवाय पोलीस कर्मचारी खरोखर गुन्हेगाराच्या घरी गेलेत की नाही, याचीही पडताळणी या ऍपद्वारे होते. कर्मचाऱयांनी जागेवर जाऊन ऍपवर फोटो अपलोड केले आहेत.

काय आहे सीआयएमएस

z या सिस्टीममध्ये सराईत गुन्हेगारांची सर्व माहिती भरून सतत अपडेट करण्यात येते. एखाद्या गुन्हेगाराने गुन्हा केला तर त्या जिह्यातील अंमलदाराला गुन्हेगाराचे दुसऱया जिह्यातीलही गुन्हे दिसणार आहेत. यामध्ये त्याची लपण्याची ठिकाणे, त्याचे वकील, घर, वाहन, कुटुंब, त्याचे उत्पन्न अशी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. तपास, अटक व चौकशीसाठी वापर करणे अशी ही सिस्टीम आहे. जेणेकरून नवीन आलेल्या अधिकाऱयाला त्याची मदत होणार असून, गुन्हेगारांची सर्व कुंडली उपलब्ध होणार आहे. यामुळे आंतरराज्य जिल्हा, राज्य गुन्हेगारांच्या टोळ्या पकडणे सोपे होणार आहे.