
शेवगाव शहरातील मारवाडी गल्ली येथील आडत व्यापारी दगडूशेठ ऊर्फ गोपीकिसन बलदवा यांच्या घरावर सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला. या हल्ल्यात दीर व भावजय यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर एक महिला गंभीर जखमी झाली. या घटनेमध्ये चार लाख 95 हजारांचा ऐवज चोरीला गेला होता. ही घटना शुक्रवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास घडली. या घटनेची शेवगाव पोलीस ठाण्यात नोंद केली होती.या घटनेमुळे शहरातील नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आणि याच्या निषेधार्थ शनिवारी मोर्चा काढण्यात आला होता. अखेर या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
शेवगांव येथील आडत व्यापारी व त्यांची भाऊजयीचा चोरीच्या उद्देशाने खुन करणारा सराईत आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा नगरची कारवाई केली आहे. खेडकर टाबर चव्हाण (32), रा. म्हारोळा, बिडकीन, ता. पैठण, जिल्हा संभाजीनगर शुक्रवार रोजी पहाटे 4.00 वा. चे सुमारास फिर्यादी सुनिता गोपीकिसन बलदवा (48), रा. मारवाडगल्ली, ता. शेवगांव यांचे घराचा वरच्या मजल्यावरील लाकडी दरवाजा अनोळखी इसमाने उघडुन आत प्रवेश करुन चोरीच्या उद्देशाने फिर्यादी यांचे पती गोपीकिशन गंगाबिसन बलदवा यांना व जाऊबाई पुष्पा हरीकिसन बलदवा (60) अशा दोघांना डोक्यात मारुन, जिवे ठार मारले. तसेच फिर्यादी यांना लोखंडी कटावणी व विटेने मारहाण व जखमी करुन 4,95,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख चोरुन नेली होती. सदर घटने बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं. 552 / 2023 भादविक 302, 397, 307, 460 प्रमाणे खुनासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन नाशिक विभागाचे पोलीस उप महानिरीक्षक. शेखर पाटील , विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी घटनेची माहिती घेवुन राकेश ओला, पोलीस अधिक्षक, नगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमणे, सदर गुन्हा उघडकीस आणणे करीता आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुन्ह्याचा समांतर तपास करणे करीता तीन वेगवेगळी पथके तयार केली. एका पथकाने शेवगांव, शहरातील सीसीटीव्ही फुटेजचे आधारे आरोपीचा माग घेणे तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पडताळणी करत होते. दोन पथके लगेच बीड व पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर परिसरातील संशयीत तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडे तपास करुन गुन्हा उघडकीस आणणे कामी प्रयत्न करत होते.
आरोपींचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत सुचना देवुन पथके रवानापथके शेवगांव परिसरात फिरुन घटना ठिकाणचे व आजु बाजूचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन त्या आधारे तपास सुरू केला. दरम्यान नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदाराकडुन माहिती मिळाली की, सीसीटीव्ही फुटेज मधील आरोपी हा खेडकर चव्हाण रा. बिडकीन, ता. पैठण, जिल्हा संभाजीनगर हा असुन तो त्यांच्या गावी आहे. आता गेल्यास तो भेटेल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि दिनेश आहेर यांनी तात्काळ प्राप्त माहिती पथकास कळवुन पंचाना सोबत घेवुन तसेच स्थानिक पोलीसांची मदत घेवुन संशयीत आरोपीचे गावी म्हारोळा, बिडकीन, ता. पैठण येथे पाठवुन आरोपीचे ठावठिकाणाबाबत खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथकाने बिडकीन, ता. पैठण येथे जावून वाल्मिक निकम, स्थागुशा, छत्रपती संभाजीनगर (ग्रा) यांना मदतीस घेवुन संशयीत आरोपीची माहिती घेतली असता सदरचा संशयीत आरोपी हा म्हारोळा, बिडकीन, ता. पैठण येथे गांवात फिरताना दिसला त्याला शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव खेडकर टाबर चव्हाण, (32) रा. म्हारोळा, बिडकीन, ता. पैठण, असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने टाटा एस. गाडीमध्ये येवुन गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास शेवगांव पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे.
नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील गणेश वारुळे, हेमंत थोरात, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, अतुल लोटके, विजय वेठेकर, दत्तात्रय गव्हाणे, बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, रविंद्र कर्डीले, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, संदीप दरदंले, संदीप चव्हाण, फुरकान शेख, घुगांसे, अमृत आढाव, बाळासाहेब खेडकर, जालिंदर माने, शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ, प्रशांत राठोड, संदीप पवार,चापोहेकॉ संभाजी कोतकर,उमाकांत गावडे, चापोना/ भरत बुधवंत व चापोकों/ अरुण मोरे तसेच शेवगांव पोलीस स्टेशन नेमणुकीचे बाप्पा धाकतोडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने ही कारवाई केली
आरोपी नामे खेडकर टाबर चव्हाण हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोक्का, खुनासह दरोडा, खुनासह जबरी चोरी, चोरीच्या उद्देशाने खुन करणे चोरी असे गंभीर स्वरुपाचे एकुण 07 गुन्हे दाखल आहेत






























































