नगर जिल्ह्यात विक्रमी 167 रुग्णांची नोंद, आज 46 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

नगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दिवसभरात एकूण 115 रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले. याशिवाय, खासगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या 52 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामुळे जिल्ह्यात आज विक्रमी 167 रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या 1322 इतकी झाली आहे.

गुड न्यूज – मानवी चाचण्या यशस्वी झाल्यानंतर रशिया ‘या’ तारखेला कोरोनावरील पहिली लस करणार लॉन्च

जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 516 इतकी झाली आहे. दरम्यान, आज 46 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 773 झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या