नगर शहरातील शाळांना फेब्रुवारीचा मुहूर्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

राज्य सरकारने आजपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपविला आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने शहरातील शाळा आज सुरू झाल्या नाहीत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात शाळा सुरू होऊ शकतात, अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.

मनपा आयुक्त शंकर गोरे म्हणाले, शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे. या समितीचा सदस्य या नात्याने अजून आठ ते दहा दिवस शाळा सुरू केल्या जाऊ नयेत, अशी आपली भूमिका राहणार आहे. नगर शहराचा कोरोना पॉझिटिव्हीटी रेट सध्या 17 ते 18 टक्के आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.