
मनात जिद्द असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते. नगर येथील कर्नल परब शाळेत इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱया 13 वर्षीय अबशाम फिरोज पठाण या विद्यार्थ्याने उत्तराखंड राज्यातील हिमालयाच्या रांगेत असलेल्या 12 हजार पाचशे फूट उंचीचे केदारपंठ शिखर अवघ्या दोन दिवसांत सर केले आहे.
केदारपंठ शिखर ट्रेक अत्यंत कठीण आणि खडतर आहे. तीन ते पाच फूट उंचीच्या बर्फातून तीन दिवस चालावे लागते. परंतु, अबशाम याने हे शिखर दोन दिवसांत सर केले, तर एका दिवसात तो गेलेल्या मार्गाने परतला आहे. अबशामच्या या कामगिरीमुळे सर्व स्तरातून त्याच्यावर काwतुकाचा वर्षाव होत आहे. हे अवघड शिखर सर केल्याबद्दल कर्नल परब शाळेचे संचालक दिलीप परब, गीता परब, अहिल्या शिवप्रेमी ट्रकर्सचे संचालक श्रीरंग राहिंज यांनी त्याचे विशेष काwतुक केले आहे.
असा आहे हा अवघड ट्रेक
सांक्री या बेस व्हिलेजपासून ट्रेकला सुरुवात होते. नऊ हजार पाचशे फुटावर जुडा का तालाब या बर्फाच्छादित तलावावर पहिला मुक्काम असतो. दुसरा मुक्काम 11 हजार 250 फुटावर हाडे गोठवणाऱया थंडीत आणि बर्फाच्छादित छोटय़ा समतोल जागेवर असतो. त्याच दिवशी रात्री दोन वाजता 90 अंशांच्या काटकोनी शिखरावर सुमारे पाच तासांची चढाई करावी लागते. सर्वत्र बर्फ असल्यामुळे कोठेही विश्रांतीसाठी बसता येत नाही. सकाळी सुमारे साडेसहा वाजता हा ट्रेक पूर्ण होतो. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर तिसऱया दिवशी केदारपंठ शिखर सर होते. माघारी येताना याच प्रकारे दोन दिवस बेस व्हिलेजपर्यंत लागतात.






























































