अहमदपूर तालुक्यातील मौजे गोताळा येथून मुलीस पळवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

अहमदपूर तालुक्यातील मौजे गोताळा येथून अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने पळवून नेले आहे. अहमदपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मुलीच्या भावाने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, दिनांक 15 मे रोजी दुपारी त्याला वडीलांनी फोनवर सांगितले की, दुपारपासून मुलगी घरी आली नाही. अज्ञात व्यक्तीने तिला पळवून नेले. सर्व ठिकाणी तीचा शोध घेतला असता ती कुठेही सापडून आली नाही.