एअर इंडियाची इंधनकोंडी

230

आर्थिक तोटय़ात असलेल्या एअर इंडियाकडे आता इंधनाची थकबाकी भरायलाही पैसे उरले नाहीत. त्यामुळे सरकारी तेल वितरण कंपन्यांनी एअर इंडियाच्या विमानांना इंधन द्यायला नकार दिला आहे. तब्बल साडेचार हजार कोटींची थकबाकी दिली नाही म्हणून गुरुवारी दुपारी सरकारी तेल वितरण कंपन्यांनी देशातील कोचीन, विशाखापट्टणम्, मोहाली, रांची, पुणे आणि पटना विमानतळांवर एअर इंडियाच्या विमानांना इंधन भरण्यापासून रोखले. एअर इंडियाला थकबाकी भरण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली जाते. मात्र, सहा महिन्यांत एक रुपयाही न दिल्याने एअर इंडियाचा इंधनपुरवठा थांबवण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या