
अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत बदलापूर येथील दिपक पाठक यांचा मृत्यू झाला आहे. दिपक पाठक हे एअर इंडियात गेल्या 11 वर्षांपासून केबिन क्रू म्हणून कार्यरत होते. पाठक कुंटुंब गेल्या अनेक वर्षांपासून बदलापूर येथील रावल कॉम्प्लेक्समध्ये राहत आहेत. विमान दुर्घटनेची बातमी समोर येताच त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.






























































