एअर इंडियाच्या भरतीमुळे इंडिगोची विमाने जमिनीवरच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एअर इंडियाच्या नोकरभरतीला हजर राहता यावे यासाठी इंडिगोच्या कर्मचाऱयांनी एकाच वेळी ‘सिक लिव्ह’ टाकल्याने इंडिगोच्या 55 टक्के फ्लाईटना फटका बसून त्या लेट झाल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागल्याची घटना शनिवारी घडली. टाटा समूहाने अलीकडेच बुडीत गेलेली ‘एअर इंडिया’ कंपनी चालविण्यास घेतली आहे.

एअर इंडियाच्या फेज टूच्या नोकरभरतीची प्रक्रिया सुरू असून त्यास हजर राहता यावे यासाठी इंडिगोच्या क्रू मेंबर्सनी एकाच दिवशी आजारपणाची रजा टाकल्याने इंडिगोची विमाने शनिवारी लेट झाली. इंडिगो ही देशातील मोठी विमान कंपनी असून सुमारे 1600 विमानांचा ताफा कंपनीकडे असून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही सेवा ही कंपनी देते. मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार 45.2 टक्के विमाने वेळेत होती असे म्हटले आहे.

एअर इंडियाची नवीन भरती…

गेल्या वर्षी 8 ऑक्टोबर रोजी एअर इंडियाच्या विक्रीची निविदा जिंकल्यानंतर 27 जानेवारीपासून दि टाटा ग्रुपने एअर इंडियाचा ताबा घेतला आहे. एअर इंडियाने नवीन विमाने विकत घेण्याची आणि आपली सेवा सुधारण्याची योजना आखली आहे. त्यासाठी नवीन भरती सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.