आंतरराष्ट्रीय उड्डाण 1 ऑगस्टपासून सुरू होणार

12 जून 2025 ला एअर इंडियाचे विमान एआय 171 अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करताच अवघ्या काही सेकंदांतत कोसळले. या अपघातानंतर एअर इंडियाने काही आंतरराष्ट्रीय उड्डाणे थांबवली होती, परंतु आता येत्या 1 ऑगस्टपासून थांबवण्यात आलेली आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा एकदा सुरू केली जाणार आहेत. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये काही उड्डाणे पुन्हा एकदा सुरू केली जाणार आहेत. विमान प्रवाशांची सुरक्षा हेच आपले ध्येय आहे, असे एअर इंडियाने म्हटले आहे.