
सामना प्रतिनिधी । मुंबई
नागरी उड्डाण मंत्रालयाने 1 जुलैपासून उड्डाण सुरक्षा शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे विमान प्रवास काही प्रमाणात महागणार आहे. परदेशी प्रवाशांबरोबरच देशांतर्गत प्रवाशांनाही या शुल्कवाढीचा फटका बसणार आहे. पुढील महिन्याच्या सुरुवातीपासूनच हिंदुस्थानी प्रवाशांकडून 130 रुपयांऐवजी 150 रुपये इतके उड्डाण सुरक्षा शुल्क आकारले जाणार आहे, तर परदेशी प्रवाशांना 3.25 डॉलर्सऐवजी 4.85 डॉलर्सचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. यासंदर्भात नागरी उड्डाण मंत्रालयाने शुक्रवारी आदेश जारी केला. विमान प्रवाशांकडून प्रवासी सेवा शुल्काऐवजी उड्डाण सुरक्षा शुल्काची आकारणी केली जाणार आहे.




























































