
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
जीओच्या एन्ट्रीमुळे टेलिकॉम सेक्टरमधील कंपन्यांमध्ये ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेत ग्राहकांची मात्र चांदी होताना दिसत आहे. आता जीओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक जबरदस्त प्लॅन लॉन्च केला आहे. नव्या रिचार्जची किंमत 181 रुपये असून याद्वारे ग्राहकाला दिवसाला 3 जीबी डाटा (2जी, 3जी, 4जी) मिळणार आहे.

एअरटेलच्या 181 रुपयांच्या प्लॅनमध्ये दिवसाला 3 जीबी डाटासह अमर्याद व्हाईस कॉल (लोकल, एसटीडी आणि रोमिंग), दिवसाला 100 एसएमएसची सुविधा मिळणार आहे. या पॅकची मर्याता 14 दिवसाची असणार आहे. यात ग्राहकाला एकून 42 जीबी डाटा मिळेल. याचा अर्थ प्रत्येकी एक जीबी डाटासाठी ग्राहकाला 4.3 रुपये खर्च करावी लागणार आहेत. परंतु मर्यादीत क्षेत्रासाठी हा प्लॅन उपलब्ध असणार आहे.
सध्या बाजारामध्ये प्रतीदिन 3 जीबा डाटाचा एकही प्लॅन नाही. एअरटेलने या आपल्या प्लॅनद्वारे जीओच्या 198 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनला टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे. जीओच्या या प्लॅनमध्ये दिवसाला 2 जीबी 4जी डाटा, अमर्यादीत व्हाईस कॉल, दिवसाला 100 एसएमएस मिळतात आणि याची मर्यादा 28 दिवसांची आहे. यात ग्राहकाला एकू 56 जीबी डाटा मिळतो.


























































