या कारणामुळे काँग्रेस आणि जेजेपीची युती नाही झाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज हरयाणात जेजेपीच्या पाठिंब्यामुळे भाजपने सत्ता स्थापन केली. भाजपचे मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर जेजेपीच्या दुष्यंत चौटाला यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी दुष्यंत सिंह चौटाला यांच्या आई नैना चौटाला आणि वडील अजय चौटालाही उपस्थित होते.

अजय चौटाला दोन आठवड्यासाठी तुरुंगातून बाहेर आले. काँग्रेसला सत्तेसाठी का पाठिंबा नाही दिला याचे स्पष्टीकरणही अजय चौटाला यांनी यावेळी दिले. अजय चौटाला म्हणाले की, “काँग्रेस विरोधातूनच जेजेपीचा जन्म झाला आहे. पक्ष फुटला असता. त्यामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले असते. तसेच कुटुबांलाही त्याचा फटका बसला असता असे अजय चौटाला यांनी सांगितले.

दुष्यंत चौटाला यांच्या शपथविधीला अजय चौटाला हजर होते. एका वडिलांसाठी हा आनंदाच क्षण आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. पुढील पाच वर्षे हे सरकार टिकेल तसेच हरयाणाचा विकास होणार असा विश्वासही त्यांनी यावेळी केली.