अजय देवगण सिनेमाच्या शुटींग दरम्यान झाला जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण याच्याबाबत एक बातमी समोर आली आहे. चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ या सिनेमाच्या शुटींग दरम्यान अपघात झाला. यामध्ये त्याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता अजय देवगण याचा आगामी सिनेमा ‘सिंघम अगेन’ मुळे चर्चेत आला आहे, सध्या तो या सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाचे शूटिंग मुंबईतील विलेपार्ले येथे सुरू होते. यावेळी सिनेमातील एक अॅक्शन सीन शूट केला जात होता, त्याच दरम्यान अजयच्या डोळ्याला दुखापत झाली. यानंतर अजय देवगणने शूटिंगमधून काही तासांचा ब्रेक घेतला. सिनेमाच्या सेटवरच डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. डॉक्टरांची परवानगी मिळताच अजयने पुन्हा सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली.

सिनेमाचे सर्व पोस्टर समोर आल्यानंतर ही घटना घडली आहे. आता ‘सिंघम अगेन’चे सिनेमाचे शेड्यूल केवळ मुंबईस्थित फिल्मसिटीमध्येच होणार आहे. रोहित शेट्टी या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहे. या सिनेमात अजय देवगणसह करीना कपूर खान, दीपिका पदुकोण आणि टायगर श्रॉफ यांचाही सहभाग असणार आहे. त्याचबरोबर रणवीर सिंग आणि अक्षय कुमार देखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.