मुलीला चित्रपटात लॉन्च करण्याबद्दल काय म्हणाली काजोल; वाचून तुम्हीही व्हाल थक्क…

जगभरात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हिंदुस्थानात ही याचा मोठा प्रभाव पाहायला मिळत असून आतापर्यंत हजारो रुग्णाचा यामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र आता सरकारने लॉकडाऊन शिथिल केले आहे. असे असले जरी सामान्य लोकांप्रमाणेच बॉलीवूड सेलिब्रिटीही घरातून कमीच बाहेर निघत आहेत. अशातच सेलिब्रिटींशी निगडित अनेक किस्से आणि गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर येत आहेत. याचदरम्यान अजय देवगन आणि काजोल यांची मुलगी ‘न्यासा देवगन’ची एक बातमी खूप व्हायरल होत आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर चित्रपटसृष्टीत नेपोटिझमच्या मुद्द्याने जोर धरला आहे. अनेक नेटकरी नेपोटिझमच्या मुद्द्यावरून सेलिब्रिटी किड्सला ट्रॉल करत आहेत. अशातच इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांशी बोलताना काजोलने मुलगी न्यासाच्या बॉलिवूड लाँच बद्दल धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. इंस्टाग्रामवर बोलत असताना एका चाहत्याने काजोलला प्रश्न विचारला की, ती आपल्या मुलीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार का, यावर तिने नाही म्हणून उत्तर दिले. यानंतर चाहत्यांनी तिला विचारलं की, न्यासाला चित्रपटात काम कराच आहे का? यावर ही तिने नाही म्हणून उत्तर दिल आहे.

दरम्यान, एका मुलाखतीत बोलताना काजोलने सांगितलं होत की, न्यासा चित्रपटांमध्ये काम करू इच्छित नाही. तिला वर्ल्ड क्लास शेफ बनण्याची इच्छा आहे. अजय देवगन आणि काजोल यांचा 1999 मध्ये विवाह झाला होता. या दोघांना न्यासा आणि युग नावाचे दोन मुले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या