
सामना ऑनलाईन, मुंबई
‘परमाणू’नंतर निर्माता अजय कपूर आणि अभिनेता जॉन अब्राहम पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. आगामी ‘रोमिओ अकबर वॉल्टर’ या चित्रपटात हे दोघे काम करणार आहेत. अजय कपूर यांनी या चित्रपटाची र्नििमती केली आहे. हा एक रोमांचकारी चित्रपट असून गुजरात, कश्मीर, दिल्ली आणि नेपाळमध्ये या चित्रपटाचे शूिंटग होणार आहे. चित्रपटाविषयी बोलताना जॉन म्हणाला, ‘परमाणू’ करताना खूपच मजा आली. तो अनुभव खूपच खास होता. अजय कपूरसोबत नव्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप खूश आहे.’



























































