मनोज जरांगे हेकेखोर; रोज पलटी मारतात, अजय महाराज बारस्कर यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जरांगे रोज पलटी मारतात. सातत्याने भूमिका बदलतात आणि नेहमी खोटं बोलतात. या माणसाने अनेक मराठा कुटुंबांना उद्ध्वस्त केले आहे. मराठा समाज खूप भोळा असून समाजातील गरिबाला आरक्षण हवे आहे. पण यांना फक्त श्रेय, जेसीबीतून फुलं आणि कार्यक्रम हवेत, असा आरोप अजय महाराज बारस्कर यांनी केला.

सर्वांसमोर जरांगे बोलत असल्याने समाजाने त्यांच्यावर विश्वास ठेवला. पण आंदोलन काळात ते अनेक गुप्त बैठका आणि पह्नापह्नी करत होते. त्याचा मी साक्षीदार आहे, असे बारसकर म्हणाले.

मनोज जरांगे हा नाटकी माणूस आहे. जरांगेंनी 23 डिसेंबरला पहिली गुप्त मिटिंग कन्हैया हॉटेलला घेतली. रांजणगाव गणपती येथे उच्चपदस्थ अधिकारी यांच्यासोबत बैठक केली. लोणावळा, वाशी येथेही समाजाला वगळून बैठक केली. जरांगे यांना कायद्यातील काहीही कळत नाही. कोणत्याही शब्दावर अडून राहतात. पंधरा मिनिटांत शासन निर्णय आणि अधिसूचना द्या म्हणे. अर्धवट ज्ञान बेक्कार असतं म्हणतो, पण स्वतःचं काय?, असा सवाल त्यांनी केला. मला अनेक पह्न येत आहेत, गोळ्या घालून मारू. माझं काम सत्य सांगणं आहे. जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला. तो मी सहन करणार नाही असे ते म्हणाले. जरांगेने उपोषणाचा बनाव केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यापर्यंत यावेत, त्यांनी त्यांना पाणी पाजावे यासाठी जरांगे यांनी उपोषण सोडतानादेखील अट्टहास केला असा आरोपही त्यांनी केला.

बच्चू कडू यांच्या प्रहारमधून बारस्कर यांची हकालपट्टी

मनोज जरांगे यांच्यावर हेतुपुरस्सर आरोप केल्यावरून आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षातून अजय महाराज बारस्कर यांची हकालपट्टी केली आहे. जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन आणि आरक्षणविषयी कोणीही भूमिका मांडू नये. बारस्कर यांची मराठा आंदोलनाविषयीची भूमिका पक्षाला मान्य नाही. त्यांचे समर्थन प्रहार करत नाही, असे पत्रक काढत बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.