वेगळ्या संविधानाने देशाच्या सार्वभौमत्वाला धोका – अजित डोवाल

10
ajit-doval

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कोणत्याही राज्यासाठी वेगळे संविधान असणे म्हणजे देशाच्या सार्वभौमत्वाला धोका असण्यासारखे आहे, असे वक्तव्य हिंदुस्थानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केले. डोवाल यांचा रोख जम्मू-कश्मीरकडे असल्याचे दिसून आले. हिंदुस्थानचे पोलादी पुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आयुष्यावर आधारित एका पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा, स्वायत्तता देण्यासाठी असलेले ‘35 -अ’ कलम यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना डोवाल यांनी केलेले हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.

वाचा विशेष लेख : जम्मू-कश्मीरचा विशेष दर्जा आणि कलम ३५ अ

अजित डोवाल म्हणाले की, ‘देशाचे सार्वभौमत्व चुकीच्या आणि कमकुवत पद्धतीने मांडले जाऊ शकत नाही. हिंदुस्थान सोडून जात असताना हा देश आपल्या मागे एकसंध असावा अशी इंग्रजांची धारणा नक्कीच नव्हती. सरदार वल्लभभाई पटेल यांनी हे वेळीच ओळखले होते. त्यामुळे वल्लभभाई पटेल यांचे योगदान एका राज्यापुरते मर्यादीत नसून संपूर्ण देशात एकात्मता आणि सार्वभौमत्व नांदण्यासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. म्हणूनच जम्मू-कश्मीरमध्ये वेगळे संविधान असणे हे देशाच्या सार्वभौमत्वासाठी योग्य नाही.’

आपली प्रतिक्रिया द्या