ईडी चौकशीनंतर जयंत पाटलांना फोन का नाही केला? अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी 9 तास ईडी चौकशी झाली. या चौकशीनंतर आपल्याला महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांचे आणि वेगवेगळ्या पक्षातील मित्रांचे फोन आले, मात्र अजित पवार यांचा फोन आला नाही, असे जयंत पाटील म्हणाले. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेची गुऱ्हाळं सुरू झाली. याबाबत आता अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर आपली आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान पत्रकारांनी जयंत पाटील यांना फोन का केला नाही असा प्रश्न उपस्थित केला. याला अजित पवार यांनी सविस्तर उत्तर दिले.

जयंत पाटील यांना एकट्यालाच ईडीने चौकशीसाठी बोलावले नाही. याआधी छगन भुजबळ यांनाही बोलावले होते. त्यावेळी मी काही वक्तव्य केले असेल तर मला दाखवा. अनिल देशमुख यांना देखील बोलावले होते. त्यावेळी मी काही वक्तव्य केले असेल तर ते दाखवा. प्रफुल्ल पटेल यांच्यावेळी मी काही बोललो असेल तर दाखवा. तुम्ही लोकं जाणीवपूर्वक काहीतरी अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात, असे अजित पवार म्हणाले.

मी आतापर्यंत कोणाच्याही बाबतीत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. माझ्याही बाबतीत आयकर विभागाने 22 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यावेळी काय बोलायचे ते मी बोललो होतो. त्यानंतर पुन्हा मी माझ्या कामाला लागलो, असेही ते म्हणाले. तसेच तपास यंत्रणांना चौकशीचा अधिकार आहे, मात्र भाजपमध्ये गेलेल्यांची चौकशी होत नाही. आमदार, खासदारांनी जाहीर कार्यक्रमात हे बोलून दाखवले आहे, असेही अजित पवार म्हणाले.

स्टँप पेपरवर लिहून देतो! महाविकास आघाडी 100 टक्के राहणार!!

द्वेष आणि राजकीय सूडभावनेतून चौकशीला बोलवणे चुकीचे आहे. मी कोणत्याही नेत्याच्या चौकशीवर प्रतिक्रिया देत नाही. भुजबळ आणि मलिक यांच्या प्रकरणावरही मी बोललो नाही, तर फोन कशाला करू. जेव्हा मी त्यांना भेटेन तेव्हा मी बोलेन, असेही ते अजित पवार म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)