महाविकास आघाडीत शिवसेनेसोबत काम करणे सुखावणारे! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत शिवसेनेचे महत्त्वाचे योगदान आहे. राज्याच्या राजकारणातला एक प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेसोबत महाविकास आघाडीत काम करणे सुखावणारे आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली शिवसेना भविष्यात अधिक यश मिळवेल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेच्या 54 व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना, शिवसेना नेते व मंत्रिमंडळातील सहकारी, शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या. अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत शिवसेनेचे महत्त्वाचे योगदान आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक प्रमुख पक्ष आज महाविकास आघाडीत आमच्यासोबत आहे, याचा आनंद आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शिवसेनेसोबत काम करत असताना येणारे अनुभव सुखावणारे आहेत. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली शिवसेना भविष्यात अधिक यश मिळवेल, असे पवार म्हणाले.