‘चंपा’ला पवारांशिवाय काही दिसत नाही, अजित पवारांची टीकेची पातळी घसरली

1931
ajit-pawar

विधानसभा निवडणुकीला आता खऱ्या अर्थाने रंगत येत आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. काही वेळा एकमेकांवर चिखलफेक करताना नेत्यांची टिकेची पातळीही घसरताना दिसत आहेत.

बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या बड्या नेत्याची खिल्ली उडवली. पत्रकाराच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी त्या ‘चंपा’ला पवारांशिवाय काही दिसत नाही, अशी टीका केली. त्यानंतर ‘चंपा’ म्हणजे नक्की कोण? याचेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.

शरद पवारांना राजकारणातून कायमची विश्रांती देणार- चंद्रकांत पाटील

राष्ट्रवादीकडून पिंपरी-चिंचवडमधील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांच्या पवार कुटुंबातील तरुण भविष्यात भाजपमध्ये येऊ शकतात. आले तर त्यांचे स्वागत आहे, या वक्तव्याचा हवाला देत अजित पवार यांना चंद्रकांत पाटलांविषयी प्रश्न केला. याला उत्तर देताना अजित पवार यांची पातळी घसरली.

तीन महिन्यांत सातबारा कोरा नाही केला, तर पवारांची अवलाद सांगणार नाही

पवारांच्याशिवाय त्या ‘चंपा’ला काही दिसतच नाही. हा शॉर्ट फॉर्म आहे जस अप म्हणजे अजित पवार, तसे चंपा म्हणजे चंद्रकांत पाटील असे त्यांनी यावेळी सांगितलं. ते जे काही म्हणतात त्याला काही अर्थ नाही. प्रत्येक वेळेस राजकारणातून शरद पवार दूर जातील असे म्हणतात. शरद पवार यांनी किती चढउतार पाहिले आहे. 55 आमदारांपैकी 50 आमदार सोडून गेले. 5 आमदार राहिले तरीही तितक्याच तत्परतेने बाहेर पडले. आजही तुम्ही पाहता, शरद पवार हे आक्रमक भूमिकेतून हे सरकार बदलायचे बोलतात, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या