शरद पवारांना राजकारणातून कायमची विश्रांती देणार- चंद्रकांत पाटील

2815

विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांना राजकारण आणि समाजकारणातून कायमची विश्रांती देणार, असे वक्तव्य भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. त्याचवेळी मी कोथरूडमधून निवडून येणार असा आत्मविश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

राधानगरी मतदारसंघातील शिवसेना उमेदवार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचारसभेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. आपल्याला कोथरूडमध्ये अडककून ठेकण्यासाठी मोर्चेबांधणी करणार्‍यांना साधा उमेदकार देता आला नाही यावरून त्यांच्या पक्षांची ताकद किती उरली आहे ते कळून येते. मी कोथरूडमधून निकडून येणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला.

निवडणुकीत ‘नोटा’चा वापर लोकशाहीला घातक

निवडणुकीत ‘नोटा’ या पर्यायाचा कापर हे लोकशाहीसाठी घातक आहे. एक कोणीतरी उमेदकार आकडत नसेल तर मग असलेल्या उमेदकारांपैकी बरा उमेदकार जो आहे त्याला मतदान कराके. त्याला मतदान करण्यासाठी आपण बाहेर पडले पाहिजे, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. कोथरूडमध्ये पाटील यांच्या उमेदवारीला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या